Jalna Times भररस्त्यात गाडी लावून हवेत गोळीबार .
Jalna Times एका तरुणाने भर रस्त्यात गाडी आडवी लावून हवेत गोळीबार केल्याची घटना काल दिनांक 20 रात्री 9 च्या सुमारास घडली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या तरुणास पिस्तूल सह ताब्यात घेतले .
अधिक माहिती अशी की सोनू जाधव या युवकाने काल दिनांक 20 रात्री 9 सुमारास एका व्यक्तीशी वाद घालताना चित्रपटासदृश्य आपली गाडी नूतन वसाहत भागातील लहुजी साळवे चौकात आडवी लावली व पिस्तूल काढून काही गोळ्या हवेत झाडल्या .या घटनेने परिसरात सगळीकडे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले .याबाबत माहिती मिळताच कदम जालना पोलीस स्टेशनचे फौजदार ज्ञानदेव नागरे व इतर सहकार्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन सोनू जाधव या युवकाला पिस्तुला सह ताब्यात घेतले . पुढील तपास सुरू .