जालना येथील संत रामदास शासकीय वस्तीगृह मुलांना दिल्या जाणाऱ्या अल्पहारात अळ्या ‘ विजेची तारे उघडी असायाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला .
जालना येथील संत रामदास शासकीय वस्तीगृह मुलांना दिल्या जाणाऱ्या अल्पहारात अळ्या निघल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला .
अधिक माहिती अशी की संत रामदास शासकीय वस्तीगृह जालना जिल्ह्यातील मुले शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृह राहतात यांना सकाळी अल्पहार व दोन टाईम जेवण दिले जाते .पण हे जेवण भेसळ युक्त व अत्यंत खालच्या स्तराचे असते .असे निवेदन देऊन झाले असून काल दिनांक 19 रोजी अत्यंत खालच्या स्तराची पातळी घाटून विद्यार्थ्यांच्या अल्पहार अळ्या निघल्या चा प्रकार समोर आला .सकाळी दिलेल्या पोह्यामध्ये अळ्या आढळल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राट दारावर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे . दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे निवेदन करून सदर प्रकरणाची पूर्णपणे तपासणी होऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे ठामपणे बजावून सांगितले अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला .यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जालना जिल्हा सहसंयोजक प्रतिक कुलकर्णी व शहर मंत्री गणेश बोंडे ,सहमंत्री शुभम खराबे व इतर काही सहकारी उपस्थित होते