लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अंबा – परतुर .
परतूर/प्रतिनीधी -परतूर तालुक्यातील आंबा गावचा इशारा शहरातील पोलीस स्टेशन चौक ते इंदिरानगर रोड वरील अतिक्रमण हटवा नाहीतर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .ग्रामस्थांनी या संदर्भात सहाय्यक निवडणूक अधिकारी परतूर यांना निवेदन देऊन त्यांचे म्हणणे स्पष्ट केले .
परतूर नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही अतिक्रमण हटले नाही व निवेदनांवर आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही .
ग्रामस्थांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी परतूर यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे उल्लेख केला की जर हे अतिक्रमण हटविले नाही तर आम्ही आगामी परभणी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू .