Jalna News दुर्दैवी घटना ,भाविकांनी भरलेली गाडी विहीरीत कोसळली .

Hello Jalna दुर्दैवी घटना पंढरपुर वरून वापस येताना भाविकांनी भरलेली काळी पिवळी गाडी विहीरीत पडल्याची दुर्दैवी घटना ही घडली . सदर घटना ही जालना राजूर रोडवर घडली . अ तुपेवाडी जवळ हा भिषण अपघात झाला असुन यात ६ भाविकांचा मृत्यू झाला अशि माहिती समोर येत आहे .

पंढरपुर वरून वापस आलेल भाविक हे जालन्या वरून राजुरकडे जाण्यासाठी काळीपिवळी गाडीत बसले होते व गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी ही तुपेवाडी गावा जवळील विहीरीत पडली . घटने दरम्यान गाडी मध्ये 12 भाविक असल्याचे सांगितले जात आहे . त्यामधले 6 जनांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत व काही जणांना बचाव कर्त्यानी बाहेर काढले . बाहेर काढलेल्या व्यक्तीवर जिल्हा सामन्य रुग्नालयात उपचार सुरु आहेत . पोलीस दल व अग्नी शामक दलाचे पुर्ण प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आलीय .