Jalna News शाळेत नशा करून येणाऱ्या शिक्षकाचे निलंबन.

Jalna /प्रतिनिधी :सेवली ता . Jalna .येथील जिल्हा परिषद शाळेत नशा करून येणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश हे जिल्हा परिषद सीईओ वर्षा मीना यांनी पारित केले .

या संदर्भात अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद शाळा सेवली येथील मुख्याध्यापक हे शाळेत मद्य प्राशन करून येतात अशी तक्रार मागील काही महिन्यांपूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली होती . ही तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्याकडे केली होती . वर्षा मीना यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला . तपासा दरम्यान शिक्षकाला आपली बाजू मांडण्यास वेळ दिला होता व यासंदर्भात चौकशीसाठी समितीचे गठन करण्यात आले होते .या प्रकरणा संदर्भात चौकशी समितीने मुख्याध्यापक यांच्या विरोधात अहवाल दिल्याने वरील प्रकरणात ही कार्यवाही करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *