अक्षरशः शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला कचऱ्याच्या गाडीत.

मस्तगड परिसरात भरलेला आठवडी बाजारात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली हद्दपार शेतकऱ्यांना उठवून लावण्यासाठी त्यांचा भाजीपाला कचऱ्याच्या गाडीत भरून नेण्यात आला .

जालना शहरातील गांधींच्या मते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील काम सुरू असून या मार्गावर आठवडी बाजार भरत असतो पण रस्त्याच्या कामामुळे हा बाजार येथे भरू शकत नाही म्हणून तात्पुरती बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली होती तीन-चार आठवडी बाजार हा मस्तगड वीज वितरण कंपनी समोर भरला होता पण आज दिनांक 14 वार रविवार रोजी हा बाजार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उठून लावला शेतकऱ्यांचा भाजीपाला हा कचऱ्याच्या गाडीत भरून नेण्यात आला .

शेतकऱ्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला .