तलवार बाळगल्या मुळे गुन्हे शाखेने केली दोघांवर कारवाही .
धारदार तलवार बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका तरुनास जेरबंद केले असता त्यांनी ही तलवार दुसऱ्या व्यक्तीकडून केक कापण्यासाठी आणल्याचे सांगितले .तलवारीच्या मुख्य मालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले .
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अवैध शास्त्राचा शोध घेत असताना अधिकाऱ्यांना अशी माहिती मिळाली की सोमनाथ जळगाव येथील एक तरुण हा धारदार तलवार बाळगत आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कार्यवाही करून कृष्णा रोगडे यांच्याकडून तलवार जप्त केली व पुढील तपासात असे लक्षात आले की तलवारीचा मूळ मालक हा वेगळा आहे ही तलवार वझर सराटे येथील लखन ढाकणे या व्यक्तीची आहे व कृष्णाने ही तलवार वाढदिवसानिमित्त केक कापण्यात करिता आणली होती .
दोघाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात आली