Jalna Times पत्नीच्या खुणात जन्मठेप भोगणार तो .
Hello Jalna जिल्हा सत्र न्यायालयाने संदीप कदम यास बायकोची हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अधिक माहिती अशी की संदीप कदम वय 28 व सीमा कदम यांचा विवाह झाला होता पण काही कारणाने रमा कदम ह्या माहेरी निघून गेल्या असता संदीप हा दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी रमा कदम (पत्नी )यांना भेटण्यासाठी व नांदायला यावे या कारणाने गेला असता रमा यांनी येण्यास नकार दिला .संदीप याने नकार ऐकून पत्नी रमा कदम यांच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली .
सदर प्रकरणातील फिर्यादी भगाजी अचलखांब ( रमा यांचे वडील ) यांच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन जालना येथे गुन्हा दाखल केला .व पुढील तपास करून दोषारोप पत्र दाखल केले .विद्यमान न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायालय ,न्यायाधीश श्री एस आर तांबोळी यांनी संदीप यास कुणाच्या आरोपात दोषी ठरवून 50000 रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा सुनावली