14 Apr रोजी मिरवणुकी दरम्यान गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू .


जालना/प्रतिनिधी – दिनांक 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणूकीतून युवकाला बाजुला नेऊन गंभीर मारहाण करण्यात आली होती .त्या युवकाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले होते .मात्र काल दुपारी दिनांक 17 युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रसंगी पाच जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे .
इंदेवाडी तालुका जालना येथील रहिवासी वीरेंद्र महेंद्र शेडूते या युवकाचे नूतनवसाहत भागातील एका युवतीशी प्रेम संबंध होते .या संशयावरून दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतून श्री सरस्वती भुवन समोरून काही तरुणांनी वीरेंद्रला उचलून अज्ञात स्थळी नेले तेथे प्रेम प्रकरण खरे की खोटे याचा खुलासा कर असे म्हणत मारहाण केली .त्यात वीरेंद्र हा जखमी झाला व त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे नेण्यात आले .दि 17 रोजी वीरेंद्र चा उपचारादरम्यान मृत्यू झाला .
नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये टाकून कदिम नगर पोलीस स्टेशन समोर आणला व गुन्हेगारांवर वर कारवाई करण्याची मागणी केली .