तहसीलदार यांच्या आदेशावरून वाळू उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकार्यांवर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला .
जालना/प्रतिनिधी – जालना तालुक्यातील पाचनवडगाव शिवारातील नदीपात्रात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच वाळू उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई होऊ न देता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे .
दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी सात वाजता ची ही घटना .
तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी इरफान शेख आणि इतर दोन अधिकारी पाचनवडगाव शिवारातील नदीपात्रात उतरून गेले असता त्यांना तिथे काही ट्रॅक्टर वाळू उपसा करताना दिसून आले .अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली असता त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारण्यात आले .अधिकाऱ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तिघांविरुद्ध गुन्ही दाखल करण्यात आले आहे