सहा खाटकांवर गुन्हा दाखल,पोलिसांनी गोवंशाची कत्तल करताना रंगेहात पकडले .
बदनापूर शहरात गोवंशाची कत्तल होत आहे व त्यावर स्थानिक प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे अशी तक्रार माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देण्यात आली होती .पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांना दिलेल्या तक्रारीवर वैयक्तिक लक्ष देऊन पुढील निर्देश हे पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल यांना दिले व निर्देश मिळतात जयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना करून सकाळी कार्यवाही घेऊन आणली व सहा व्यक्तींना गो वंशाची कत्तल करताना रंगेहात पकडले . |
अधिक माहिती अशी की बदनापूर येथील कुरेशी मोहल्यात गोवंशाची कत्तल होत आहे अशी वारंवार तक्रार करून सुद्धा स्थानिक प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क साधून तक्रार नोंदविली .तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली असता या कारवाईत सकाळी पाचच्या सुमारास छापा टाकून सहा जणांना रंगेहात गोवंशाची कत्तल करताना पकडले व त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 ,5 (c) 9 ( a) 5 ( b) व 1 1 व भादवि कलम 429 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . |