फळबागेचे अनुदान गेले कुठे ? थिगळखेडा येथील संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालया समोर उधळली निवेदनाची कागदपत्रे .

फळबागेचे अनुदान गेले कुठे थिगळखेडा तालुका भोकरदन येथील संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालया समोर उधळली निवेदनाची कागदपत्रे .

अधिक माहिती अशी की थिगळखेडा येथील शेतकऱ्यांनी 2019 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड केली मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप या शेतकऱ्यांना कुठलीही सहाय्यक निधी प्राप्त झालेला नाही वारंवार पाठपुरावा करूनही सदर प्रकरणात कुठलाहीप्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत सदर प्रकरणात केलेले सर्व अर्ज हे कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उधळले .

रितसर शांततेच्या मार्गाने योग्य तो पाठपुरावा करून सुद्धा कुठलाही प्रतिक्रिया सुदर कार्यालयाकडून प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांनी ही वेगळी आंदोलनात्मक कार्यवाही केलेली दिसून येते .