6 जुलै 2024 ला होणार कोतवाल परीक्षा .जालना शहरातील 14 परीक्षा केंद्र सज्ज .

जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रिक्त कोतवाल पद भरण्यासाठी दिनांक 6 जुलै 2024 रोजी वार शनिवार दुपारी 3ः 30 मि ते 5 या कालावधीत जालना शहरातील 14 केंद्रावर ही परीक्षा होणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रिवार यांनी 26 जून 2024 ला प्रसारित केली .

यापूर्वी सदर परीक्षा दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती परंतु काही गैरप्रकारामुळे ही परीक्षा/पदभरती रद्द करण्यात आली होती . आता ही परीक्षा 6 जुलै 2024 वार शनिवार रोजी ठेवण्यात आली आहे .

यावेळेस कुठलाही गैरप्रकार न होण्यासाठी योग्य ती तरतूद केली दिसून येते परीक्षा केंद्रावर योग्य तो बंदोबस्त झालेला आहे .