12 जुलै रोजी होणाऱ्या महा रॅली संदर्भात आज सिपोरा बाजार ता .भोकरदन येथे नियोजन बैठक पार पडली .

भोकरदन / प्रतिनिधी :- मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या 12 जुलै 2024 रोजी नियोजित केलेल्या महा रॅली संदर्भात आज दिनांक 3 जुलै 2024 वार बुधवार रोजी सकाळी 8 वा च्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

. यासंदर्भात संक्षिप्त माहिती अशी की मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 12 जुलै 2024 रोजी जालना येथे महा रॅलीचे नियोजन केले आहे .या संदर्भात आज सिपोरा बाजार तालुका भोकरदन या ठिकाणी सकल मराठा समाजाने एकत्र बैठक करून 12 जुलै 2024 ची नियोजन बैठक पार पडली . या बैठकीत सर्व मराठा बांधवांनी 12 जुलै रोजी जालना येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचा अग्रह केला आहे .