Jalna Times 19 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल .

Jalna Times समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करणाऱ्या मराठा आंदोलनावर गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 18 ते 19 मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . दि 25 ला केलेल्या रस्ता रोको आंदोलनाचे हे परिणाम एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले होते .

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा हा नववा दिवस असल्याकारणाने पाटलांची तब्येत खालावली म्हणून बऱ्याच ठिकाणी विद्यमान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले होते .हे आंदोलन सुद्धा त्यातीलच एक आंदोलन सरकार विरुद्ध पुरुष व्यक्त करण्यासाठी मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर टायर जाळले व रस्ता रोको केला .

आंदोलकांवर बी एम एस कलम 126/2 189/2 191/2 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले .