ग्रामसेवकाला रंगेहात पकडले . मागत होता लाच .
ग्रामसेवकाने प्लॉट फेरफार करण्यासाठी मागितले पाच हजार रुपये वरील घटना ही देवगाव खवणे तालुका मंठा येथील आहे .
सविस्तर बातमी अशी की देवगाव खवणे येथील एका व्यक्तीने गावात प्लॉट खरेदी केला व त्याची फेरफार नोंद घेण्यासाठी त्याने ग्रामसेवकाची भेट घेतली . व त्याला सदर प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे सुपूर्त केली .परंतु या कामासाठी ग्रामसेवकाने पाच हजार रुपयाची मागणी केली .ही मागणी बेकायदेशीर असून या म मागणीला त्रासून त्या व्यक्तीने सदर बाबीची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली .विभागाने पडताळणी करून ग्रामसेवकाला मंठा येथे लाज घेताना रंगेहात पकडले व मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला .