Jalna News जालना महानगरपालिकेच्या वॉचमनला जातिवाचक शिवीगाळ .
Hello Jalna “जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी महानगरपालिकेच्या वॉचमनला जातीवादी शिवीगाळ केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला . “
असा आरोप मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे यांनी आज दिनांक 5 जुलै वार शुक्रवार रोजी पत्रकार परिषदेत सांगितले .
मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष यांनी प्रशासनाला या प्रकारात योग्य ती चौकशी करून न्यायालयीन कार्यवाही करण्याचा आग्रह केला .