Jalna news पोलिसांनी केली गर्भपात केंद्रावर कार्यवाही .आरोग्य विभाग व पोलीस यांची संयुक्त कार्यवाही .

Hello Jalna भोकरदन शहरातील नामांकित दवाखान्यातील हा प्रकार .जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना वरी ल अवैध प्रकाराची माहिती मिळतात त्यांनी या अवैध गर्भपात व गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकून योग्य ती कारवाई केली .

संदर्भातील संपूर्ण माहिती अशी की दिनांक 6 जुलै रोजी 4 दरम्यान जिल्हाशैल्य चिकित्सक व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त कार्यवाही केले . मिळालेल्या सूचना लक्षात घेता दोन्ही कार्यालयांनी भोकरदन शहरातील एका नामांकित सोनोग्राफी सेंटरवर छापा मारला . व तेव्हा एका महिलेचे अवैध गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगे हात पकडले .पुढील तपासात दोन सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या व सुमारे आठ लाख एवढी रक्कम जप्त करण्यात आली . व या संदर्भातील गुन्हे डॉक्टर लावण्यात आले .