Jalna Times व्यापाऱ्याने गोळी झाडून संपवले स्वतःचे जीवन.
Hello Jalna मूलचंद भगवानदास कापड दुकानाचे संचालक अल्केश बगडिया यांनी काल दि 24 वार मंगळवार रोजी सकाळी 9 च्या दरम्यान राहत्या घरात डोक्यात गोळी झाडल्याचे घटना समोर आली आहे . नातेवाईकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली .
अल्केश बगडिया यांनी कुठल्या कारणाने स्वतःवर गोळी झाडली याचा उलगडा अद्याप झाला नाही सादर घटनेवर बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही घरच्यांना सुद्धा या घटनेने मोठा धक्का बसला आहे .
घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे