चाकू भोसकून युवकाचा खून ;

प्रतिनिधी जालना शहर :- शुल्लक कारणावरून युवकाची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे . ही घटना 27 जून रात्री नवीन औद्योगिक वसाहत परिसरात घडली असून या प्रकरणात दोन जणांना चंदंनझिरा पोलीस स्टेशन यांनी अटक केले आहे .

मयताच्या संतप्त नातेवाईकांनी दोन जणांना नव्हे तर या प्रकरणात अजून काही लोक शामिल आहेत व त्यांच्या अटकेची मागणी करत चंदनझिरा पोलीस स्टेशन समोर ही ठिय्या दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे .

अधिक माहिती अशी की नवीन औद्योगिक वसाहत परिसरात पंचमुखी नगर भागात गुरुवारी सय्यद नदी सय्यद रहीम या युवकाला दारू पाजून छातीवर गळ्यावर व डोक्यात वार केले व त्यात त्या युवकाचा मृत्यू झाला .पुढील तपास सुरू आहे .