परतुर पोलिसांनी वाचवला वासरांचा जीव . कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश परतुर पोलिसांनी ताब्यात घेतला .

परतूर /प्रतिनिधी :- अधिक माहिती अशी शहरातील कुरेशी मोहल्ला भागातील लड्डा कॉलनी येथे ही कारवाई करून सुमारे 43 हजार रुपये किमतीच्या गोवंशाची सुटका करण्यात आली .या वासरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार असा निरोप मिळताच पोलिसांनी सक्रियता दाखवून या वासरांना ताब्यात घेतले व पुढील आदेशा पर्यंत या वासरांना नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले . असुन पुढे अशा प्रकारची कुठलीही घटना खपवून घेतल्या जाणार नाही असा पोलीसांनी इशारा दिला आहे .